जागावाटपाच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर नाराज
दिवाळीसाठी दादर - काजीपेट उत्सव विशेष ट्रेन
मुंबई, 22 ऑक्टोबर।
रेल्वेने दिवाळीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येची पूर्तता करण्यासाठी उत्सव दादर ते काजीपेट विशेष ट्रेनची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
१. 07196 / 07195 दादर - काजीपेट साप्ताहिक विशेष (निजामाबाद, करीमनगर मार्गे) (१८ सेवा)
07196 दादर- काजीपेट साप्ताहिक विशेष दि. २८.११.२०२४ ते दि. ३०.०१.२०२५ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)
07195 काजीपेट- दादर साप्ताहिक विशेष दि. २७.११.२०२४ ते दि. २९.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)
07196 / 07195 चे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बसर, निजामाबाद, आरमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिगंमपेट जगित्याल
२. 07198 / 07197 दादर- काजीपेट साप्ताहिक विशेष (पिंपळखुटी, बल्लारशाह मार्गे) (१६ सेवा)
07198 दादर- काजीपेट साप्ताहिक विशेष दि. ०१.१२.२०२४ ते दि. २६.०१.२०२५ पर्यंत दर रविवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (८ सेवा)
07197 काजीपेट - दादर साप्ताहिक विशेष दर शनिवारी दि. ३०.११.२०२४ ते दि. २५.०१.२०२५ पर्यंत चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (८ सेवा)
07198 / 07197 चे थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिरयाल, पेड्डापल्ली आणि जमिकुंटा.
या गाड्यांच्या वेळा आणि संरचना यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : उत्सव विशेष ट्रेन क्र. 07196 आणि 07198 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्वथळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.